बूर्गान्य-फ्रांश-कोंते
Appearance
बूर्गान्य-फ्रांश-कोंते प्रदेशाचे नकाशावरील स्थान
बूर्गान्य-फ्रांश-कोंते Bourgogne-Franche-Comté | |||
फ्रान्सचा प्रदेश | |||
| |||
बूर्गान्य-फ्रांश-कोंतेचे फ्रान्स देशामधील स्थान | |||
देश | फ्रान्स | ||
राजधानी | बेझॉंसों | ||
क्षेत्रफळ | ४७,७८३ चौ. किमी (१८,४४९ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | २८,११,४२३ | ||
घनता | ५९ /चौ. किमी (१५० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-BFC | ||
संकेतस्थळ | https://www.bourgognefranchecomte.fr |
बूर्गान्य-फ्रांश-कोंते (फ्रेंच: Bourgogne-Franche-Comté उच्चार ) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्सच्या पूर्व भागात स्थित असलेल्या ह्या प्रदेशाच्या पूर्वेस स्वित्झर्लंड देश तर उर्वरित दिशांना फ्रान्सचे इतर प्रदेश आहेत. २०१६ साली बूर्गान्य व फ्रांश-कोंते हे दोन प्रदेश एकत्रित करून बूर्गान्य-फ्रांश-कोंते प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. तुलूझ हे दक्षिण फ्रान्समधील प्रमुख शहर बूर्गान्य-फ्रांश-कोंते प्रदेशाचे मुख्यालय आहे.
विभाग
[संपादन]बूर्गान्य-फ्रांश-कोंते प्रशासकीय प्रदेश खालील आठ विभागांमध्ये विभागला गेला आहे.
- दूब (Doubs)
- श्युरॅ (Jura)
- ऑत-सॉन (Haute-Saône)
- तेरितॉर दे बेल्फॉर (Territoire de Belfort)
- कोत-द'ओर
- न्येव्र
- सॉन-ए-लावार
- योन
प्रमुख शहरे
[संपादन]- दिजाँ (1,56,920)
- बेझॉंसों (115,934; प्रदेशाचे मुख्यालय)
- बेल्फोर (47,656)
- ऑसेर (34,634)
- मेकाँ (33,638)
- नेव्हर्स (32,990)
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2023-05-26 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |